Mira Road Murder Case : मिरारोड येथील लिव्ह इन पार्टनरच्या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी ५६ वर्षीय मनोज साने याला अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली असून तिथं पीडित महिलेच्या मृतदेहाचे १२ ते १३ तुकडे सापडले आहेत. प्रेयसी सरस्वती वैद्य हिचे तुकडे करण्यासाठी सानेनं झाड कापण्याच्या करवतीचा वापर केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.