PM Narendra Modi on Manmohan Singh : प्रख्यात अर्थतज्ज्ञ व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं २६ डिसेंबर रोजी निधन झालं. मनमोहन सिंह हे तब्बल ३३ वर्षे संसदेचे सदस्य होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या आणि भारताला जगाची कवाडे खुली करून देणाऱ्या मितभाषी मनमोहन यांना जगभरातून आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, मनमोहन सिंग यांचं निधन हे सर्वांसाठी दु:खदायी आहे. त्यांच्या जाण्यानं एक राष्ट्र म्हणून आपलं मोठं नुकसान झालं आहे. फाळणीनंतर भारतात येऊन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणं ही सामान्य गोष्ट नाही, अशा शब्दांत मोदींनी मनमोहन सिंग यांच्या लढवय्या वृत्तीचं कौतुक केलं.