Narendra Modi speech in New parliament : देशाच्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. उद्घानानंतर पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या शेजारी राजदंड स्थापित केला. 'हे केवळ एक भवन नाही, १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचं प्रतिबिंब आहे. हे भवन जगाला भारताच्या दृढ संकल्पांचा संदेश देत आहे. हे लोकशाहीचं मंदिर आहे, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं. लोकशाही ही आमच्यासाठी केवळ व्यवस्था नाही, संस्कार, विचार आणि परंपरा आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.