Narendra Modi speech Video : ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांसारख्या तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैरवापर करत असल्याच्या आरोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत उत्तर दिलं. तपास यंत्रणांना मी कारवाईची खुली सूट दिली. त्यांनी प्रामाणिकपणे आणि प्रामाणिकांसाठी काम करावं इतकीच माझी सूचना आहे. सरकार त्यांच्या कामात अजिबात हस्तक्षेप करणार नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले.