narendra modi on dynasty politics and casteism : स्वातंत्र्याच्या ७८ व्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केलं. पंतप्रधान म्हणून मोदींचं हे सलग ११ वं भाषण होतं नरेंद्र मोदी हे अकराव्यांदा लाल किल्ल्यावरून जनेतेला संबोधित करत आहेत. नैसर्गिक आपत्ती, बांगलादेशातील हिंदूंची परिस्थिती, कोलकाता डॉक्टर बलात्कार, एक देश-एक निवडणूक, भारताचा विकास, नवा फौजदारी कायदा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. राजकीय घराणेशाही व देशातील जातीवादावर त्यांनी हल्लाबोल केला. घराणेशाही व जातीवादामुळं देशाच्या लोकशाहीचं नुकसान झालं आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. एक देश-एक निवडणुकीची गरजही त्यांनी व्यक्त केली.