Naredra Modi on crime against women : ‘महिलांवरील अत्याचार हे अक्षम्य पाप आहे. हे पाप करणारा कोणीही असो, तो सुटता कामा नये. त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्यांनाही सोडता कामा नये. सर्वांचा हिशेब व्हायला हवा,’ असं स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. जळगाव इथं महायुतीनं आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. बदलापूर येथील शाळेतील चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बोलत होते. मोदींनी बदलापूरचा थेट उल्लेख केला नसला तरी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली.