Narendra Modi Speech Video : उत्तर प्रदेशातील संभल येथील कल्की धाम या हिंदू मंदिराची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. 'प्रत्येकाकडे देण्यासारखे काही आहे पण माझ्याकडे काहीच नाही, मी फक्त माझ्या भावना व्यक्त करू शकतो, असं आचार्य प्रमोद कृष्णम हे यावेळी पंतप्रधानांना म्हणाले. त्यावर मोदींनी भाष्य केलं. 'तुम्ही मला काही दिले नाहीस हे बरे झाले, नाहीतर काळ असा बदलला आहे की आजच्या युगात सुदामानं श्रीकृष्णाला तांदूळ दिले असते तरी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असती आणि भगवान कृष्णानं भ्रष्टाचार केला असा निकाला आला असता,' असं पंतप्रधान मोदी म्हणाले.