Video : महिला आरक्षणाची घोषणा करताना काय म्हणाले नरेंद्र मोदी? ऐका!
PM Modi on women reservation bill : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महिला आरक्षण विधेयक (नारीशक्ती वंदन अधिनियम) लोकसभेत मांडलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: याची घोषणा केली. केंद्र सरकार यासाठी घटनादुरुस्ती विधेयकाचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली. नारी शक्ती वंदन अधिनियमामुळं आमची लोकशाही अधिक मजबूत होईल. हे विधेयक मंजूर करून त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे, असं मोदी म्हणाले. संसदेतील सर्व सदस्यांनी सर्वसंमतीनं हे विधेयक मंजूर करावं. तसं झाल्यास या कायद्याची ताकद अनेक पटीनं वाढेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.