Video : पंकजा मुंडे यांचे निर्णायक लढाईचे संकेत
Pankaj Munde Video : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला. गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांची त्यांच्याच पक्षात कोंडी होत असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या काय बोलतात याबद्दल उत्सुकता होती. मी झुकणार नाही, असं पंकजा यांनी यावेळी पुन्हा एकदा सांगितलं. भाजपला शिखरावर पोहोचविण्यात योगदान असलेल्या गोपीनाथ मुंडे यांची मी कन्या आहे. मी लोकांसाठी राजकारणात आहे. मी अनेकदा माझी भूमिका मांडली. ती कायम आहे. माझे शब्द बाणासारखे असतात. एकदा सोडले की परत घेत नाही, असं पंकजा यावेळी म्हणाल्या.