vijay wadettiwar on wagh nakh : 'इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही आणि त्यांनी तसं कधी म्हटलेलंही नाही,' असं आता लंडनमधील म्युझियमनेच स्पष्ट केलं आहे. तसं पत्र म्युझियमच्या व्यवस्थापनानं ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना लिहिलं आहे. या पत्रावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला घेरलं आहे. वाघनखं खरी आहेत की खोटी याची माहिती नसताना सरकारमधले मंत्री लंडनला कशासाठी गेले? हा सगळा दिखावा आणि खर्च कशासाठी केला याचं उत्तर आता राज्य सरकारनं द्यायला हवं. महाराष्ट्राच्या जनतेची ही फसवणूक आहे. शिवभक्तांच्या भावनेशी खेळ आहे,' अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.