Supriya Sule on Maharashtra Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात मोठी गडबड झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. संसदेतही हा आरोप करण्यात आला. त्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. निवडणूक आयोग हा नि:पक्षपाती असला पाहिजे एवढंच म्हणणं आहे. पक्ष तोडणं, मतदारयाद्यांत घोळ घालणं आणि चिन्हांचे गोंधळ घालणं असा चौफेर हल्ला विरोधकांवर केला जातोय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.