Supriya Sule on Ravindra waikar : शिंदे सेनेत गेलेले व खासदार म्हणून निवडून आलेले रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला टीकेची झोड उठवली आहे. सुप्रिया सुळे यांनी आज वायकर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. रवींद्र वायकर यांच्या कुटुंबाला कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं आहे हे आम्ही स्वत: पाहिलं आहे. आता पोलीस म्हणतात आमच्याकडून चूक झाली. एवढी मोठी चूक कशी होऊ शकते? आता महायुतीमध्ये आल्यानंतर वायकर क्लीन झाले आहेत. मग ते भ्रष्टाचारी होते की नव्हते यांचं उत्तर आता भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.