mehboob shaikh Speech Video : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली आहे. पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेला सुरुवात झाली. त्या निमित्तानं जुन्नरमध्ये शुभारंभाचा मेळावा झाला. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख यांनी तडाखेबंद भाषण केलं. नागपंचमीला सापाला एक दिवस दूध पाजतात. पण शरद पवार साहेबांनी २०-२० वर्षे सापांना दूध पाजलं. त्यांनी साहेबांशी गद्दारी केली. लोकांचा अपमान केला. लोकांचा अपमान करून हे आता जनसन्मान यात्रा काढतायत, अशी घणाघाती टीका शेख यांनी अजित पवार यांच्या पक्षावर केली.