Jayant Patil Speech Video : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या राज्यात सुरू आहे. याच यात्रेचा भाग म्हणून बारामती इथं काल जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष भाष्य केलं. बारामती विधानसभा निवडणूक युगेंद्र पवार हेच लढवतील असे संकेत त्यांनी यावेळी दिले. मात्र त्यांनी थेट तसं जाहीर करण्याचं टाळलं. काय म्हणाले जयंत पाटील? पाहा व्हिडिओ