Jayant Patil speech at Indapur Rally : भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. हर्षवर्धन पाटील यांनी आता पुन्हा कार्यकर्त्यांशी चर्चा करू नये. आता घेतलेला निर्णय फायनल आहे. आता भविष्यात याच पक्षात तुम्हाला राहायचं आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्यपातळीवरील नेते आहेत. आमच्या पक्षात त्यांचं महत्त्व मोठं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. ही लढाई महाराष्ट्रातील नाही. शरद पवार साहेब दिल्लीशी लढाई करत आहेत. दिल्लीला धडा शिकवायचा असेल तर पवार साहेबांचे हात बळकट करा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.