sharad pawar taunt pm Narendra modi : घाटकोपर पश्चिम इथं झालेल्या पक्षाच्या युवा संवाद मेळाव्यात शरद पवार यांनी तरुणांना संबोधित केलं. देशातील सध्याची बेरोजगारी, शेतीची अवस्था यावर त्यांनी भाष्य केलं. आमच्या सरकार जेव्हा केंद्रात आलं तेव्हा आपला देश धान्य आयात करणारा देश होता. आम्ही सत्ता सोडली तेव्हा आपला देश धान्य निर्यात करणारा देश बनला. आज वेगळं चित्र आहे. आताच्या सत्ताधाऱ्यांचं शेती प्रश्नाकडं लक्ष नाही. बेरोजगारी वाढत आहे. परीक्षेला बसणारी मुलं दहा-दहा दिवस आंदोलन करत आहे. दुसरीकडं केंद्र सरकार काही ठराविक लोकांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतं. हे राज्यकर्ते लोकांच्या हिताची जपणूक करणारे नाहीत, असं पवार म्हणाले. माझं बोट धरून राजकारणात आले असं नरेंद्र मोदी सांगतात. आज देशाची स्थिती पाहिल्यानंतर मला माझ्या बोटाची काळजी वाटायला लागते. बोट भलत्या-सलत्याच्या हातात दिल्यानंतर काय होत हे कळलं, असा टोला पवार यांनी हाणला.