Sharad Pawar on mps Suspension video : संसदेच्या दोन्ही सभागृहातून एकूण १५० खासदारांना निलंबित करण्याच्या तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘सरकार विरोधकांकडं दुर्लक्ष करून कारभार करण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील जनता सर्वकाही पाहत आहे. याची सरकारला जबरदस्त किंमत मोजावी लागेल,’ असा इशारा त्यांनी मोदी सरकारला दिला.