Sharad Pawar On marathi : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी आज सविस्तर प्रतिक्रिया दिली. या निर्णयाला उशीर झाला असला तरी तो झाला याचा आनंद आहे. याबद्दल मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो. हे सगळं होण्यासाठी राज्य सरकार, साहित्य क्षेत्रातील विविध संस्था, संघटना व आमच्यासारख्या अनेक लोकांनी प्रयत्न केले. त्याचं चीज झालं. याचा अनेक प्रकारे फायदा महाराष्ट्राला होईल, असं शरद पवार म्हणाले.