Nana Patole on Koyta gang : कोयता गँगसह राज्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला. कोयता गँगचा त्यांनी विशेष उल्लेख केला. ही गँग आता पुण्यातून नाशिकपर्यंत पोहोचली आहे. अवैध धंदे वाढत आहेत. ह्या सगळ्या टोळ्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? राज्य सरकार यावर काय कारवाई करतेय?,' असा सवाल पटोले यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. सरकारनं यावर खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.