Supriya Sule on pune metro inauguration : भूमिपजून आणि उद्घाटनांसाठी आज होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पावसाच्या शक्यतेमुळं रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोलेबाजी केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ‘पुणे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी आज सहाव्यांदाच या कामाचं उद्घाटन करायला येणार होते,’ याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली. अत्यंत बिझी असलेल्या पंतप्रधानांचा वेळ महाराष्ट्र सरकार अशा कामासाठी कसा काय घेते, असा सवाल सुळे यांनी केला.