Raj Thackeray on Reservation : नवनिर्माण यात्रेच्या निमित्तानं सोलापूर दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादावर भाष्य केलं. मुळात हा प्रश्न शिक्षण, बेरोजगारी आणि नोकऱ्यांचा आहे. त्यात जातीचा प्रश्नच नाही. आज खासगीकरण मोठं आहे आणि खासगी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आरक्षणानं खरंच शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये किती लोकांना फायदा होणार आहे याचा विचार आपण करणार आहोत का? इथं फक्त माथी भडकवण्याचं काम सुरू आहे, इथे फक्त मतांचं राजकारण सुरू आहे हे प्रत्येक समाजाने समजून घेतलं पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.