Raj Thackeray Video : पुण्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे शहरातील पूरस्थिती, सध्याची प्रशासकीय व्यवस्था, राज्य सरकारचा कारभार आणि पुनर्विकासाच्या मुद्द्यावरील गोंधळावर भाष्य केलं. केंद्र सरकार महापालिकांच्या निवडणुकाच घेत नाही. लोकांनी जायचं कुठं? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. बाहेरच्या राज्यातल्या लोकांना फुकट घरं दिली जातायत आणि राज्यातले लोक भिका मागतायत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.