Raj Thackeray on Selfie : मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी सतत फोटो काढणाऱ्या आणि अवाढव्य हारतुऱ्यांनी स्वागत करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. सतत फोटो काढणं हा आजार आहे. हे थांबवा, असं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्रपतींनी मला एक खून माफ केला तर मी मोबाइलमध्ये कॅमेरा आणणाऱ्याचा खून करेन, असं राज ठाकरे म्हणाले.