Sanjay Gaikwad on Rahul Gandhi : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं आहे. राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला मी ११ लाख रुपये देईन, असं गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून सध्या राजकीय वाद सुरू झाला आहे.