Rohit pawar on Bullet Train : ‘केंद्र सरकारचा बुलेट ट्रेन हा प्रकल्प केवळ प्रतिकात्मक आहे. आमच्याकडंही बुलेट ट्रेन आहे हे जगाला दाखवण्यासाठी आहे. तो करायलाही काही हरकत नाही. पण त्याचा खर्च केंद्र सरकारनं करायला हवा. त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं कर्ज का काढायचं,’ असा रोकडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी केला. बुलेट ट्रेनचा फार फायदा होईल असं वाटत नाही. बुलेट ट्रेननं मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी अडीच तास लागणार आहेत. तोच प्रवास विमानानं एक-दीड तासात होतो. दोन्हीसाठी पैसे तितकेच मोजावे लागतात. मग विमान उपलब्ध असताना बुलेट ट्रेनची गरजच काय,’ अशी विचारणाही त्यांनी केली.