Sonali Kulkarni on Savitri Utsav : सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी या जन्मदिनानिमित्त 'सावित्री उत्सव' साजरा करण्याचं आवाहन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं समस्त महिलांना केलं आहे. आपल्यासाठी दगडधोंडे खाणाऱ्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन म्हणून आपल्या घराच्या उंबरठ्यावर 'एक पणती' लावा. तसंच, सावित्रीबाई जशा कपाळावर आडवी चिरी लावायच्या तशी चिरी लावावी आणि त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करा, असं सोनालीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.