Mahant Sudhirdas Maharaj Video : तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीवर नाशिकमधील काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या चेंगराचेंगरीमध्ये सहा जणांचा मृत्यू होणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, तिकीट लावून देवाचं दर्शन घ्यायला सांगणं ही पद्धतच वास्तविक पाहता चुकीची आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकसह दक्षिण भारतातील अनेक देवस्थानांमध्ये असलेली ही पद्धत पूर्णतः बंद झाली पाहिजे, असं सुधीरदास महाराज म्हणाले.