Juhi Chawla praises CSK and MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना गमवावा लागल्याबद्दल केकेआरची मालकीण व अभिनेत्री जुही चावला हिनं खंत व्यक्त केली. मात्र, सीएसके आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं तोंडभरून कौतुक केलं. एमएस धोनीला खेळताना पाहून मजा आली. सीएसकेच्या पाठीराख्यांची संख्या पाहून हा सामना चेन्नईत सुरू आहे की काय असं आम्हाला वाटलं, अशी कबुलीही तिनं दिली. पुढच्या सामन्यात सीएसके सारखीच कामगिरी करून दाखवू, असंही तिनं सांगितलं.