Jitendra Awhad on Lord Ram Comment : प्रभू रामचंद्र हे स्वत: मांसाहारी होते. ते शिकार करून खायचे, असं वक्तव्य केल्यामुळं वादात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘मी जे बोललो ते माझ्या मनातलं नव्हतं. वाल्मिकी रामायणात तसं लिहिलं आहे. ज्यांना हवं त्यांनी वाचावं,’ असा सल्लाही त्यांनी यावेळी त्यांच्या टीकाकारांना दिला.