Jitendra Awhad on Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा अद्यापही फरार आहे. पोलीस अद्याप त्याला अटक करू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर निशाणा साधला. 'भाजपचे लोक दाऊदला फरपटत आणणार होते, पण वाल्मिक कराडला आणू शकत नाहीत. दाऊदपर्यंत काय पोहोचणार? राजकीय तडजोडीशिवाय हे होऊ शकत नाही. इतक्या मोठ्या प्रकरणावर अजित पवारांनी साधी भूमिका मांडलेली नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.