मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : 'छत्रपतींच्या वारसांना अशी वागणूक मिळते, मग बाकीच्याचं काय?; बहुजनांनो, डोळे उघडा'

Video : 'छत्रपतींच्या वारसांना अशी वागणूक मिळते, मग बाकीच्याचं काय?; बहुजनांनो, डोळे उघडा'

31 March 2023, 18:19 IST Ganesh Pandurang Kadam
31 March 2023, 18:19 IST

Jitendra Awhad on Kala Ram Mandir Incident with Sanyogeetaraje : छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे यांना नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्रोच्चारापासून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. बहुजनांनो, डोळे उघडा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. 'छत्रपतींच्या वारसांसोबत हा प्रकार घडला ते एका अर्थानं बरंच झालं. याच सनातनी धर्माबद्दल मी बोलत होतो. आजही ते वर्णव्यवस्था असल्याचं दाखवून देतात. आणखी कुठला पुरावा हवा? छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांच काय?,' असा सवाल त्यांनी केला आहे.

Readmore