केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडला. बिहार व आंध्र प्रदेशला भरभरून देणाऱ्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा उल्लेखही नसल्याची टीका राज्यातील विरोधकांनी केली आहे. केंद्र सरकारनं ज्या घोषणा केल्या आहेत, तशा आधीही झाल्या होत्या. प्रत्यक्षात लोकांच्या हाताला काही लागलेलं नाही. त्यामुळं नव्या घोषणा ही वाऱ्यावरची वरात आहे, अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पीटाल यांनी केली आहे.