Jayant patil Speech on Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांवर भाष्य केलं. हा अर्थसंकल्प नसून निवडणुकीचा संकल्प आहे. वास्तवाचं भान ठेवून हा अर्थसंकल्प मांडलेला नाही. अर्थकारणाचा बळी देऊन सत्ता टिकवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या हिताचा नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांना धडकी भरली आहे, त्यातून काही गोष्टी केल्या आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला हे चांगलं कळतं. जनता त्याची नोंद घेईल, असं जयंत पाटील म्हणाले.