Jayant Patil video : समृद्धी महामार्गावर पडलेल्या भेगांची सध्या राज्यभरात चर्चा आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटत आहेत. समृद्धी महामार्ग राज्यापेक्षा जास्त त्या कामाशी संबंधित असलेल्या लोकांची समृद्धी करून गेला आहे. वर्षाच्या आतच त्याला भेगा पडल्या आहेत. खरंतर या रस्त्यावरील काँक्रिटची चाचणी केली पाहिजे. नेमकं त्यात काय वापरलं आहे. विरोधकांनी याविषयी आवाज उठवला की प्रकल्पाला बदनाम करता असं सत्ताधारी उलटे आरोप करतात. मात्र वस्तुस्थिती दाखवणं हे आमचं काम आहे, असं जयंत पाटील म्हणाले. विधानसभेत हे मुद्दे आम्हाला मांडता येऊ नयेत म्हणून आरक्षणाचा विषय काढून सभागृहाचं कामकाज चालू दिलं जात नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.