jayant Patil speech video : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सध्या नाशिक जिल्ह्यात आहे. दिंडोरी इथं आज झालेल्या जाहीर सभेत जयंत पाटील यांची राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका केली. विधानसभा निवडणुकीचा निकालही लोकसभेच्या निवडणुकीसारखाच लागेल असं चित्र आहे. सध्याचे सत्ताधारी जोरजोरात बोलतायत. पण हे जे बोलतायत ते काही खरं नाही हे लोकांना कळलंय. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ह्यांना सगळे लाडके दिसायला लागले. आधी कुणी लाडकं नव्हतं, असा टोला जयंत पाटील यांनी हाणला. अनेक लोक आपल्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. कारण त्यांना पुढचा अंदाज आलाय, असा दावाही जयंत पाटील यांनी यावेळी केला.