Sanjay Raut on Section 370 abrogation : स्वातंत्र्याच्या ७८ व्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केलं. पंतप्रधानांच्या या भाषणावर शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. एक लाख तरुणांना राजकारणात आणणार अशी घोषणा आज मोदींनी केली. त्यावर संजय राऊत यांनी सडकून टीका केली. याचा अर्थ त्यांना पैसे देऊन कामावर ठेवणार. राजकारण हे भाजपच्या सोयीचं असतं. त्यांनी राजकारणात दलाल निर्माण केलेत. तरुण उत्स्फूर्तपणे राजकारणात येतात. ते आणले किंवा लादले जात नाहीत. शिवसेनेत बाळासाहेबांनी असंख्य तरुणांना राजकारणात संधी दिली. काँग्रेस व राष्ट्रवादीनंही दिली. पण भाजप हा तुरुंग आहे. तिथं फक्त डांबलं जातं, असा घणाघात राऊत यांनी केला.