Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आला असून महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं पुढचे मुख्यमंत्री कोण यावर आता चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आता मोठं विधान केलं आहे. ज्यांच्या जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी विजयाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. 'हा डोंगराएवढा विजय आहे. आमचा मोठा विजय होईल असा विश्वास मी आधीच व्यक्त केला होता. लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. लाडके भाऊ, लाडके शेतकरी या सर्वांनी आमच्यावर विश्वास दाखवला. त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो, असं शिंदे म्हणाले.