Sarita Fadnavis Video : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल निर्विवादपणे महायुतीच्या बाजूनं लागले आहेत. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. आनंदीआनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे असं त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्रानं खूप मेहनत घेतली. रात्रंदिवस प्रचारात होता. खाण्यापिण्याकडंही लक्ष नव्हतं. तो मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.