Devendra Fadnavis on Badlapur School Case : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांची त्वरित नियुक्ती करण्यात आली आहे. तात्काळ आरोपपत्र दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल. अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभाग प्रयत्नशील राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.