Devendra Fadnavis on vandalism : मंत्रालयात झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया दिली. ही घटना कालची आहे. तोडफोड करणाऱ्या महिलेची काही व्यथा असेल. तिनं उद्विग्नतेतून काही गोष्टी केल्या असतील तर त्या समजून घेऊ, असं ते म्हणाले. मंत्रालयात येण्यास कोणावरही निर्बंध नसतात. सुरक्षेच्या नावावर आपण लोकांना प्रवेश नाकारू शकत नाही. यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. विरोधकांच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या दालनात पेटवून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळं राजकारण करण्याची गरज नाही. या घटनेचा पूर्ण तपास केला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.