Devendra Fadnavis on Manoj Jarange : मला जेलमध्ये डांबून मारण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एका प्रकरणात त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाल्यानंतर ते बोलत होते. त्यांच्या या आरोपांवर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. मनोज जरांगे यांच्या अटक वॉरंटशी आमचा काहीही संबंध नाही. ती न्यायालयीन प्रक्रिया आहे. एखाद्या प्रकरणात वारंवार कोर्टानं समन्स बजावूनही कोणी उपस्थित राहिलं नाही तर कोर्ट अटक वॉरंज बजावतं. ती नित्याची प्रक्रिया आहे, असं ते म्हणाले. माझ्यावर ते करत असलेले आरोप संतापातून करत असावेत, असंही फडणवीस म्हणाले.