Devendra fadnavis on vishalgad encroachment : कोल्हापूरमधील विशाळगडावरील बेकायदा अतिक्रमणं हटवण्यावरून सध्या वाद सुरू आहे. या कारवाईच्या वेळी हिंसाचार झाल्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. विशाळगडवरील अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती. अर्थात, ते कायद्यानं, नियमानं व्हावं अशी सरकारची भूमिका आहे. त्यानुसारच कारवाई सुरू आहे. आता जी परिस्थिती निर्माण झालीय, त्यातून शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, विशाळगडच नव्हे, सर्वच गडांवरील अतिक्रमण हटवण्याची आमची भूमिका आहे, असं फडणवीस म्हणाले. हे अतिक्रमण निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतंय? ते नेमके कोणाच्या बाजूनं आहेत?,' असा सवालही फडणवीस यांनी केला.