मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण घटलं; फडणवीसांचा दावा

Video : महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण घटलं; फडणवीसांचा दावा

Aug 07, 2023 03:49 PM IST Ganesh Pandurang Kadam
Aug 07, 2023 03:49 PM IST

Devendra Fadnavis Speech in Vidhan Sabha : विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील गृहविभागाशी संबंधित चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. राज्यात दररोज ७० मुली बेपत्ता होतात ही माहिती चुकीची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. खून, दरोडे, बलात्कार अशा अनेक गुन्ह्यांमध्ये मोठी घट झाली आहे. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात १२ व्या क्रमांकावर आहे. बाललैंगिक गुन्ह्यांचा विचार केला तर महाराष्ट्र १७ व्या क्रमांकावर आहे. महिला गायब होण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. काही महिला घरातून निघून जातात, हरवतात, काही पळून जातात अशी कारणं आहेत. २०२१ साली अशा प्रकरणांमधील ८७ टक्के महिला परत आल्या आहेत. त्या सापडलेल्या आहेत किंवा त्यांची सुटका करण्यात आली आहे. २०२२ आणि २०२३ मध्येही सापडलेल्या महिलांची टक्केवारी ८० ते ९० टक्क्यांपर्यंत आहे, असं त्यांनी सांगितलं.

More