devendra fadnavis in Parbhani rally : महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांची तोंडभरून स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीच्या जनतेला दिलेला संदेशाही त्यांनी इथं सांगितला. 'मी १८ व्या लोकसभेत महादेवरा जानकरांची वाट बघत आहे. परभणीकरांना सांगा, मी जानकर यांना पाठवलंय. आता त्यांना लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी परभणीकरांची आहे,' असं मोदी मला म्हणाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. जानकर हे सर्वसामान्यांचे नेते आहेत, असंही फडणवीस म्हणाले.