जळगाव इथं आज झालेल्या लखपती दीदी संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संबोधित केलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील महिलांचा अद्वितीय विकास होत आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. विकसित भारत हा महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो हा पंतप्रधानांचा विश्वास आहे. २०२९ पासून देशाचा कारभारही महिलेकडं देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी केला आहे, असं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या या विधानामुळं एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.