Devendra Fadnavis Video : राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मोर्चा स्थगित केला आहे. त्यामुळं राज्य सरकारनं सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा निघाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसंच, आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी जरांगे यांचे आभार मानले आहेत. ओबीसींवर अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.