Devendra Fadnavis Video : विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपनं आज मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर आमदारांना संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा 'एक है तो सेफ है... मोदी है तो मुमिकन है...' अशा घोषणा दिल्या. एकमतानं नेतेपदी निवड केल्याबद्दल सर्व आमदारांचे आणि नेत्यांचे आभार मानले.