Udit Raj latest Video : काँग्रेस नेते उदित राज यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती हे पद नामधारी बनवून टाकलं आहे. त्यांच्या लेखी या पदाला काही किंमत नाही. राष्ट्रपतींनी कुणाला भेटायचं आणि कुणाला नाही हे सुद्धा पंतप्रधानांचं कार्यालय ठरवतं, असा आरोप सत्यपाल मलिक यांच्या हवाल्यानं उदित राज यांनी केला. लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न प्रदान करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उभ्या होत्या आणि पंतप्रधान राजासारखे बसून होते, याकडंही उदित राज यांनी लक्ष वेधलं. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना आमंत्रण दिलं गेलं नव्हतं, याची आठवणही त्यांनी दिली.