Video : 'पुलवामा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मोदींना उत्तर द्यावंच लागेल'
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : 'पुलवामा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मोदींना उत्तर द्यावंच लागेल'

Video : 'पुलवामा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मोदींना उत्तर द्यावंच लागेल'

Apr 15, 2023 02:07 PM IST

Nana Patole on Satyapal Malik Interview: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 'द वायर' या न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहे. मोदी सरकारच्या चुकीमुळंच पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाला, असा आरोप मलिक यांनी केला आहे. तसंच, भाजपचे तत्कालीन संघटन सचिव राम माधव यांनी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असा दावाही मलिक यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराचा तिरस्कार वगैरे नाही, तसं चित्र उभं केलं गेलं आहे, असंही मलिक यांनी म्हटलं आहे. मलिक यांच्या या मुलाखतीमुळं देशाच्या राजकारणात वादळ निर्माण झालं आहे. काँग्रेसनं या मुलाखतीच्या आधारे पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे. पुलवामा हल्ला आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मोदींना देशातील जनतेला उत्तर द्यावंच लागेल, असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp