मुंबईत येणाऱ्या छोट्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयासंबंधीची माहिती दिली. 'मुंबईत प्रवेश करणाऱ्या छोट्या वाहनांना टोलमधून सूट द्यावी अशी अनेकांची मागणी होती. काही लोक कोर्टातही गेले होते. मी स्वत: देखील टोलमाफीसाठी आंदोलन केलं होतं. एकूण मागण्यांचा विचार करून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आणि आता ही आमची लाडका प्रवासी योजना आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.